नंदुरबार : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी मोठी कारवाई करत विराज चौधरी टोळीतील ९ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. खून, मारामारी, बेकायदेशीर हत्यारे व दहशत माजवणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. महिनाभरात ही दुसरी मोठी हद्दपारीची कारवाई असून, जिल्ह्यात गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
विराज चौधरी टोळीतील ९ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
