*नेर:* *जय भद्रा बहुउद्देशी संस्था प्रतापपूर येथे वंचित मुलांच्या वस्तीगृहात शालेय साहित्य वाटप* *नेर:* साक्री तालुक्यातील प्रतापपुर येथे जय भद्रा बहुद्देशीय संस्थेचे कार्य खूप मोठे असून जे काही गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील मुले शिक्षणाची गोडी असून आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही अश्या मुलांना आसरा देणे व तसेच शिक्षण हे सर्वश्रेष्ठ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानगंगेची मशाल हातात घेऊन कार्य करत असणाऱ्या जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम आदर्शवत असून भविष्यात या संस्थेत सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आव्हानप्रतापपूर येथे समाजसेवक ग्रामपुरोहित आचार्य गणू महाराज गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या वेळी शितल साळवी मॅडम (पुणे ) प्रकाश देवरे, ईशूब पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी संस्थेचा परिचय करून देत श्रीमती ज्योती देवरे( गांगुर्डे ) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गोरगरीब मुलांना आसरा आणि शिक्षण हेच सर्वश्रेष्ठ हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून वस्तीगृह सुरू केले शासनाच्या अनुदान स्वरूपात मदतीचे अपेक्षा न ठेवता या मानवादी कार्याला वेळ देऊन मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले व जितेंद्र गांगुर्डे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
Related Posts
9ऑगस्ट रोजी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : प्रभाकर आप्पा सोनवणे
9ऑगस्ट रोजी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : प्रभाकर आप्पा सोनवणे मनवेल ता.यावल : ९ आँगष्ट्र रोजी जागतिक आदीवासी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्या केशरानंद जिनींग येथे जाहीर मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्या केशरानंद जिनींग येथे जाहीर मेळावामालपुर प्रतिनिधी गोपाल कोळीदोंडाईचा ता. शिंदखेडा. सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही प्रचंड…
गणेशाचा छंद जोपासणारा अवलिया.
*गणेशाचा छंद जोपासणारा अवलिया.*मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा हा सर्वच भक्तांच लाडकं दैवत. असाच…
