प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात अवतरले बाल वारकरीनंदुरबार : 29/6/23 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, पाऊले चालती पंढरीची वाट या विठुरायाचा जयघोष करीत नंदुरबार शहरातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पश्चिम खान्देश भगिनी सेवा मंडळ संचलित प्यारी बाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली… विद्या मंदिराचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांच्यासह शिक्षिकांनी दिंडीचे पूजन केले.. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली नामाचा जयघोष करीत दिंडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.. शाळेची ही बाल वारकऱ्यांची दिंडी नंदनगरी वासियांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.. या बाल वारकऱ्यांच्या दिंडीमुळे शालेय परिसर भक्तीमय झाला होता… विठ्ठलाची भजने यावेळी सादर करण्यात आली.. विठ्ठलाचे नाम टाळ आणि मृदुंग यांच्या गजराने शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता… यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करून प्रत्यक्ष अनुभवातून मनमुराद आनंद लुटला.. या संपूर्ण दिंडीचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सोनल वळवी या शिक्षकांनी केले होते… या संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी केले होते… संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले… शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा बालदिंडीसह वारकऱ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला..
Related Posts
खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसविणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल दिनांक 01/06/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री.…
*एम. आय.एम शहादा तालुकाध्यक्ष पदी माझी नगरसेवक साजिद पिंजारी तर शहराध्यक्ष सद्दाम पिंजारी यांची निवड*
*एम. आय.एम शहादा तालुकाध्यक्ष पदी माझी नगरसेवक साजिद पिंजारी तर शहराध्यक्ष सद्दाम पिंजारी यांची निवड*ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन नंदुरबार…
रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे
*रेवाडी आश्रम शाळेचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम* गौरव बोरसे (रेवाडी):- रेवाडी येथिल आदिवासी सुंदर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च…
