*जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले* . *जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने कार्यक्रमाला श ता को ऑप एज्युकेशनल सोसा ली .शहादा चे संचालक अप्पासाहेब श्री प्रकाश पाटील , श ता को ऑप एज्युकेशनल सोसा ली .शहादा चे संचालक अण्णासाहेब श्री साहेबराव गोसावी , संस्थेचे माजी संचालक दाजी साहेब दत्तू नथू पाटील , गावाचे प्रथम नागरिक सरपंच सौ सुनीताबाई ठाकरे , पोलीस पाटील विजय दशरथ पाटील , ग्रामपंचायत सदस्य भुपेश सोनवणे ,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही .बी .पाटील , पर्यवेक्षक श्री हिरजी पाटील व बहुसंख्येत पालक वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक आप्पासाहेब श्री प्रकाश पाटील होते* . *कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले . तदनंतर मान्यवरांचे शॉल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले* . *आदिवासी दिवसानिमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ च्या चिमुकल्या शाळकरी मुला मुलींनी आदिवासी गीतांवर , आदिवासी संस्कृतीच्या पोशाख परिधान करून नृत्य सादर केले* . *महाराष्ट्राची आदिवासी संस्कृती जोपासणारा आदिवासी समाजाचे हुबेहूब पोशाख व नृत्य या चिमुकल्यांनी सादर केले . मान्यवर व पालकांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता . आपला नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने आदिवासी संस्कृती आपण जवळून पाहतो* . *या संस्कृतीचे जवळून* *दर्शन आज विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे घडले* . *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम के गवळे सर यांनी केले तर आभार सौ मनीषा माळी यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी माहेश्वरी पाटील , सौ रेणुका पाटील , सौ माधुरी पाटील , कुमारी कल्पना गुलाले , कुमारी भारती पाटील , कुमारी प्रगती जगदाळे , कुमारी महिमा पाटील , सौ ज्योती पाटील तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली . पालकांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला* .
जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
