झुंजार क्रांती वृत्तपत्र व मानव विकास पत्रकार संघाच्या विद्यमाने यशस्वी सोहळा संपन्न

*झुंजार क्रांती वृत्तपत्र व मानव विकास पत्रकार संघाच्या विद्यमाने यशस्वी सोहळा संपन्न शहादा दि.१९ जानेवारी २०२५ रविवार रोजी शहादा येथील पटेल रेसिडेन्सी मध्ये झुंजार क्रांती वृत्तपत्र व मानव विकास पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक यशस्वी सोहळा संपन्न झालेला आहे.या सोहळा मध्ये मानव विकास पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांना मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गुलाबराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले.संघातील पदाधिकारी व सदस्य यांच्या काही मुलांना विशेष पारितोषिक देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला.गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं.कौशल्य व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.मानव विकास पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हा सचिव संजय गुरव तसेच मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शिंदे यांना झुंजार क्रांती वृत्तपत्र व झुंजार फाउंडेशन कडून “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.उपस्थित असलेल्या मान्यवरांचा कौतुकास्पद सन्मान करत त्यांच्या सत्कार केला.मानव विकास पत्रकार संघाचे धुळे जळगाव नाशिक विभागातील वेगवेगळे पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.परिसरातील विविध भागातील विविध शाळेचे मुख्याध्यापक व संचालक उपस्थित होते.शासकीय अधिकारी उपस्थित असलेले मुख्याध्यापक तसेच संचालक यांच्या उपस्थितीने हा सोहळा खूप सुंदर भासत होता.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव विकास पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोळी, जिल्हा सचिव संजय गुरव तसेच त्यांच्या संपूर्ण संघातील पदाधिकारी यांनी यशस्वीपणे कार्य केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मानव विकास पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप पवार यांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले व भविष्यात अशाप्रकारे विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित केली जातील हे ही आश्वासन दिले तसेच या कार्यक्रमाद्वारे मानव विकास पत्रकार संघाचे एक विशेष मनोबल वाढेल व संघाला चालना मिळेल असे कळवले.मानव विकास पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोळी तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना मदत करून एक नवीन प्रकारचा उपक्रमाला सुरुवात केली. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य त्यांचे अनमोल सहकार्य हा सोहळा यशस्वी करण्यासाठी लागले.अध्यक्ष सरस्वती पावरा तसेच त्यांची नंदुरबार जिल्हा महिला कार्यकारणी, अध्यक्ष कालूसिंग पाडवी तसेच त्यांची नंदुरबार जिल्हा ग्रामीण कार्यकारणी, अध्यक्ष इमरान खान पठाण तसेच त्यांची अक्कलकुवा तालुका कार्यकारणी,अध्यक्ष मिलिंद भालेराव तसेच त्यांची नंदुरबार तालुका कार्यकारिणी,अध्यक्ष तेजराज निकुंभे तसेच त्यांची शहादा तालुका कार्यकारणी, अध्यक्ष मंगलसिंग वळवी तसेच त्यांची शहादा तालुका ग्रामीण कार्यकारणी अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध कार्यकारणी मधील अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सहसचिव तसेच इतर सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण जिल्हा व परिसरात कौतुक केले जात आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा सचिव संजय गुरव यांनी पार पाडले.संजय गुरव यांच्या सूत्रसंचालनाचे विशेष कौतुक केले जात आहे. भविष्यात अशाच प्रकारे काम करू अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष कृष्णा कोळी यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात अयान एल एल पी मॅनेजर पद्माकर टापरे , मित्तल ग्रुप ऑफ अफ्रिका चे संचालक जगदीश बागुल,एडवोकेट राजेश कुलकर्णी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे , शारदा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका साहिल सैय्यद मॅडम,नेताजी डे स्कूलचे मुख्याध्यापक ललित जैन , मुनिसिपल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र वसावे , सरस्वती शिशुवाटिका विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मुक्ता पाटील मॅडम, वसंतराव नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक महेंद्र मोरे , आयडियल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, मानव विकास पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसीम खाटीक , मानव विकास पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष दिलीप पाटील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र निकम,मातोश्री बहुउद्देशीय संस्थेचे डॉ डी.एम.आखाडे तसेच विविध भागातील सदस्य पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!